नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थ्याची आत्महत्या

    दिनांक :13-Jul-2019
अकोला,
हिंगणी बु. येथील विद्यार्थी शुभम मुरलीधर भोंडे याने वाणिज्य स्नातक अंतिम वर्षाची परीक्षा दिली होती.परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने त्याने गळफास लाऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवार, 13 जुलै रोजी 12.30 वाजता घडली.
शुभम बोंडे हा युवक अकोल्यातील शिवाजी महाविद्यालयात बी.कॉम अंतिम वर्षाला शिक्षण घेत होता. त्याने बी.कॉम.अंतिम वर्षाची दिली होती. येत्या काही दिवसात बी.कॉमचा निकाल लागणार असून त्याचे पेपर चांगले गेले नव्हते. आपण या परीक्षेत नापास होऊ अशी भीती शुभम बोंडेला होती. या भीतीतूनच त्याने 13 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच दहीहांडा पोलिसांनी घटनास्थळावर भेट देउन पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवला. दरम्यान, मृतक युवकाचा खिशात एक चिठ्ठी मिळाली असून त्यामध्ये बी.कॉमचे पेपर चांगले न गेल्याने आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी दहीहांडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.