सलग २३व्या दिवशी 'कबीर सिंग' चित्रपटची रेकॉर्ड ब्रेक कमाई

    दिनांक :14-Jul-2019
प्रेमात उध्वस्त झालेल्या कबीरच्या प्रेम कथने चाहत्यांना चांगलेच आकर्षीत केले आहे. सलग २३व्या दिवशी सुद्धा चित्रपटाच्या कमाईचे आकडे सतत चढत्या क्रमावर आहेत. 'कबीर सिंग' चित्रपट प्रदर्शित होताच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरला आहे. १३ जुलै रोजी चित्रपटाने जवळपास ३.७५ कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे. तर प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत चित्रपटाने एकूण २५५.८९ कोटीं रूपयांपर्यंत मजल मारली आहे.
 
 
ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले आहेत. 'कबीर सिंग' चित्रपट अभिनेता शाहिद कपूरच्या करियरला कलाटनी देणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा शाहिदला झाला आहे.
त्यामुळे शाहिदची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली आहे. पुढील चित्रपटासाठी शाहिद चक्क ३० कोटी रूपयांचे मानधन स्वीकारणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. यंदाच्या वर्षीच्या 'अडल्ड' चित्रपचांच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या 'कबीर सिंग'च्या कमाईचा आकडा सलग चढत्या क्रमावर आहे.