अभिनेत्री परिणिती चोप्रा 'या' व्यक्तीला करतेय डेट

    दिनांक :14-Jul-2019
बॉलिवूडमध्ये सध्या लिंकअप आणि ब्रेकअपच्या चर्चा सतत सुरू असतात. सध्या अभिनेत्री परिणिती चोप्रा सुद्धा अशाच एका कारणामुळे चर्चेत आहे. परिणिती तिचं खासगी आयुष्याबाबत बोलणं शक्यतो टाळते. तिच्या लव्ह लाइफ बद्दलही फारसं कोणाला माहित नाही. पण काही दिवसांपासून परिणिती एका व्यक्तीला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मीडिया रिपोर्ट नुसार परिणिती मागच्या बऱ्याच काळापासून एका व्यक्तीला डेट करत आहे आणि तिच्या सर्व जवळच्या व्यक्तींना याबाबत माहिती आहे.
 
मीडिया रिपोर्टनुसार परिणिती या व्यक्तीला 2017 पासून डेट करत आहे. ही व्यक्ती इतर कोणी नाही तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध असिस्टंट डायरेक्टर चरित देसाई आहे. परिणिती तिच्या रिलेशनशिप बद्दल कधीच बोलताना दिसत नाही. पण नुकत्याच एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत परिणितीला चरित बाबत प्रश्न विचारण्यात आलं. त्यावर बोलताना परिणिती म्हणाली, माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला सर्व माहित आहे. प्रियांका चोप्राच्या लग्नात चरित आणि परिणिती एकत्र दिसले होते.