हेमा मालिनींचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

    दिनांक :15-Jul-2019
‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत देशभरात स्वच्छता मोहीम राबवली जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या या मोहिमेला देशवासीयांनीही चांगला प्रतिसाद दिला. भाजपाच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह इतर भाजपा खासदारांनी संसद परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.
 
 
 
“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्याचा मुद्दा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मांडला. त्यामुळे आम्ही ही बाब कृतीत आणली आणि हा परिसर स्वच्छ केला. पुढील आठवड्यात मी मथुरा या ठिकाणी जाणार आहे तिथेही अशाच रितीने स्वच्छता मोहीम राबवली जाईल.” असे हेमा मालिनी यांनी म्हटले.
 
 
मात्र, हेमा मालिनी यांच्या स्वच्छता मोहिमेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी हेमा मालिनी यांना झाडू मारण्याच्या पद्धतीवरून ट्रोल केले आहे. नुकतंच ट्विटरवर एका माणसाने हेमा मालिनी यांचे पती आणि अभिनेते धर्मेंद्र यांना विचारले की, “सर, मॅडमनी कधी खऱ्या आयुष्यात हातात झाडू पकडला आहे का?” यावर धर्मेंद्र यांनी मजेशीर रिप्लाय दिला आहे.
धर्मेंद्र यांनी म्हटले आहे की, “हो, चित्रपटांमध्ये. मला पण अडाणीच वाटत होती. मी लहानपणी झाडू मारण्यात माझ्या आईला नेहमीच मदत केली आहे. मी झाडू मारण्यात तरबेज होतो. मला स्वच्छता खूप प्रिय आहे.” यावर त्या माणसाने धर्मेंद्र यांच्या प्रामाणिक उत्तराचे कौतुक केले आहे.