४५ किलो गोमांससह दोघांना अटक

    दिनांक :15-Jul-2019
साकोली,
गौमांस कापून त्याची विक्री करताना येथील दोन जणांना अटक करण्यात आली. शेख मोबीन शेख अहमद व नावेद मुमताज कुरैशी अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 45 किलो गौमांस व मांस कापण्याचे साहित्य ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाई 14 जुलै रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास साकोली पोलिसांनी केली.
 
 
शहरातील एका परिसरात गौमांस विक्री होत असल्याची माहिती बजरंग दल सहसंयोजक पुष्कर करंजेकर यांनी साकोली पोलिसांना दिली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी बजरंग दल कार्यकर्त्यांसह 14 जुलै रोजी दुपारी 2 वाजता सिव्हील वार्ड येथील शेख मोबीन शेख अहमद याच्या राहते घरी धाड टाकण्यात आली. यावेळी तेथे 6 ते 7 गाय, बैल बांधलेली आढळून आली. तर घरामध्ये मांस कापण्याचे साहित्यासह 45 किलो मांस आढळून आले. तर नावेद उर्फ मुजमदीन मुमताज कुरैशी हा कापलेले मांस विक्री करताना आढळून आला. करंजेकर यांच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी दोन्ही आरोपीविरूध्द गुन्हा नोंद केला आहे.