नागपुरात तीन दिवस पाणीपुरवठा बंद

    दिनांक :15-Jul-2019
नागपूर,
नागपूरला शहराला पाणीपुरवठा करणा-या तोतलाडोह पेंच प्रकल्पात पाण्याचा एकही थेंब नाही. पाऊस न आल्याने शहरावर पाणी संकट निर्माण झाले आहे. हवामान खात्याने १९ जुलैपर्यत पाऊस पडणार नाही, असा अंदाज व्यक्त केला. भर पावसाळयात पेंचमधील राखीव पाणीसाठयातून शहराची तहान भागविली जात आहे. पाऊसच पडत नसल्याने हा राखीव पाणीसाठयातून संपत आहे. त्यामुळे शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. परिणामत: आठवडाभरासाठी बुधवार, शुक्रवार व रविवार असे तीन दिवस शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय मनपा जलप्रदाय समितीने घेतला असल्याची माहिती सत्ता पक्ष नेते संदीप जोशी यांनी आज पञपरिषदेत दिली. समजा पाऊस आल्यास पाणीपुरवठा सुरळीत होईल, अन्यथा अशीच स्थिती राहिल्यास पाणी कपात सुरूच राहील, असेही जोशी यांनी स्पष्ट केले.