हृतिक रोशन, टायगरमध्ये होणार 'वॉर'

    दिनांक :15-Jul-2019
मुंबई,
हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ या दोघांची ऑनस्क्रीन अॅक्शन आता चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'वॉर' या चित्रपटात हे दोन बडे अॅक्शन स्टार्स एकमेकांना भिडणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
 
 
हृतिक आणि टायगरच्या चाहत्यांना दोघांना चित्रपटात एकत्र काम करताना पाहण्याची संधी मिळणार आहे. हा चित्रपट अॅक्शन, सुंदर लोकेशन याचं फुल मनोरंजन पॅकेज असेल यात काही शंका नाही. हॉलिवूडच्या तोडीस तोड असा चित्रपटाचा टीझर आहे.
काही दिवसांपूर्वी सिनेमाविषयी 'टायगर व्हर्सेस हृतिक' असा ट्रेंड सुरु होता. त्यामुळं चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली होती. कशामुळं या ट्रेंड सुरू आहे हा अंदाज प्रेक्षकांना बांधता येत नव्हता. अखेर चाहत्यांना या टीझरमुळं त्याचं उत्तर मिळालं आहे.