अप्पर पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांचे स्थानांतरण

    दिनांक :15-Jul-2019
भंडारा,
भंडाराच्या अप्पर पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांचे नागपूर येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागात पोलिस उपायुक्त पदी स्थानांतरण करण्यात आले आहे.
भंडारा जिल्हा पोलिस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. समस्या घेऊन येणाऱ्या अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या त्यांच्या स्वभावामुळे त्या सर्वांना परिचित होत्या. त्यामुळेच पोलिस आणि सामान्य लोकांमध्ये सौजन्याचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यात जवळपास तीन वर्षाच्या आसपास सेवा दिल्यानंतर त्यांचे स्थानांतरण लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे पोलिस उपायुक्त पदावर करण्यात आले. त्यांच्या ठिकाणी भंडाराचे नवे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून पुणे लोहमार्ग सुरक्षा दलाचे उपअधीक्षक अनिकेत भारती रूजू होणार असल्याचे समजते. आज 15 जुलै रोजी या संदर्भात शासन निर्णय काढण्यात आले आहे.