यवतमाळात अल्पवयीन मुलाचे अपहरण; बारा तासांत अपहरणकर्ते गजाआड

    दिनांक :16-Jul-2019

अवधूतवाडी डीबी पथक आणि एलसीबीची कामगिरी

यवतमाळ,
शहरातील एका सायकल व्यवसायीच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून 50 लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा गंभीर प्रकार सोमवारी सकाळी यवतमाळच्या शिवाजी गार्डन परिसरात घडला. तक्रार येताच अवधूतवाडी पोलिस ठाण्याचे डीबी पथक आणि एलसीबी पथकाने मोठी शोधमोहीम राबवून अवघ्या बारा तासांत प्रकरणाचा उलगडा करीत सहा अपहरणकत्यारना गजाआड केले. शहरातील सिंधी कॅम्प परिसरात राहणारे सायकल व्यवसायी ईश्र्वर नचवानी यांचा मुलगा हर्ष सोमवार, 15 जुलै रोजी सकाळी 9 च्या सुमारास घरून दुचाकी घेऊन शिवाजी गार्डन परिसरातील शिकवणी वर्गासाठी गेला होता. मात्र, बराच वेळ होऊनसुद्धा तो घरी परतला नाही म्हणून शेवटी त्याच्या कुटुंबियांनी वर्गाच्या परिसरात जाऊन विचारपूस केली. मात्र, त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. घरचे लोक हर्षची शोधमोहीम राबवीत असतानच शिवाजी गार्डन परिसरातील एका नालीत हर्षची दुचाकी आढळून आली. त्यामुळे भयभीत झालेल्या नचवाणी कुटुंबियांनी थेट अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठून ही माहिती दिली. काही वेळानंतर अपहरण झालेल्या मुलाचे वडील ईश्र्वर नचवानी यांच्या मोबाईलवर त्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची चित्रफीत आली. त्यात स्वत:चे अपहरण झाल्याची बाब त्या मुलाने स्पष्टपणे सांगितली आणि ‘पप्पा इनको 50 लाख रुपये दो, नही तो ये मुझे मार देंगे’ असा स्पष्ट उल्लेखसुद्धा हर्ष याने केला. यामुळे नचवानी कुटुंबीय अधिकच हवालदिल झाले. त्यांनी लगेच मोबाईलवर आलेल्या व्हीडीओची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच घटनास्थळ गाठले. घटनास्थळाच्या आजूबाजूला याबाबत विचारपूस केली. या भागातील संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये संध्याकाळपयरत पोलिसांना कुठलाच सुगावा लागला नव्हता. भरदिवसा घडलेल्या अपहरणाच्या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती.
 
 
 
या प्रकरणाचा छडा लावण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक, एलसीबी पथकासह अवधूतवाडी पोलिसांनी शहरात सर्वत्र शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, तपास करीत असताना अवधूतवाडी डीबी पथकाला काही बाबींचा मागोवा मिळाला. भ्रमणध्वनीवरील संभाषण आणि सायबर शाखेकडून मिळालेल्या माहितीवरून त्यांनी शुभम तोलवाणी याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यावर हा कट त्याचाच असल्याची कबुली दिली. पोलिसांनी पुढे सूत्रधार शुभम तोलवाणीच्या
सांगण्यावरून यवतमाळ शहरातील एक ठिकाणी छापा टाकला. त्या ठिकाणी पोलिसांना अपहरण झालेल्या हर्ष नचवाणी याच्यासह काही अपहरणकर्ते आढळून आले. पोलिसांनी तत्काळ हर्षची सुटका करीत सहा अपहरणकत्यारना जेरबंद केले.
पोलिसांनी हर्षला तत्काळ त्याच्या नातेवाइकांच्या स्वाधीन केले आणि अपहरणकत्यारची कसून चौकशी सुरू केली. यावेळी
अपहरणकत्यारनी अपहरणाचा हा संपूर्ण कट शुभम तोलवाणी याचाच असल्याची माहिती दिली. यानंतर एलसीबीच्या पथकाने शुभम तोलवाणी याच्यासह इतर आरोपींना अटक केली. सर्व अपहरणकत्यारची पोलिस कसून चौकशी करीत आहेत.
सूत्रधार आरोपी शुभम तोलवाणी याला क्रिकेट सट2ट्याचा शौक असून त्यात तो कर्जबाजारी झाला होता. कर्ज फेडण्यासाठी त्याने हर्षच्या अपहरणाची सुपारी यवतमाळचा एक गुंड निलेश उन्नरकाट याला दिली. त्याने आपल्या टोळीच्या साथीने हे अपहरण घडवून आणले. या दरम्यान या टोळक्याने हर्षला आधी दारव्हा मार्गावर नेले, तिथे त्याला पट्याने मारहाण
केली आणि त्याचा व्हीडीओ काढला. नंतर त्याला यवतमाळ शहरातीलच बोरेले लेआऊटमधील एका घरात आणून कोंडून ठेवले होते अशी माहिती मिळाली. या प्रकरणात अवधूतवाडी डीबी पथक आणि
एलसीबीच्या पथकाने केवळ 12 तासांत अपहरणकत्यारना अटक केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मेघनादन राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक अमरिंसह जाधव, एलसीबी प्रमुख प्रदीप शिरसकर, अवधूतवाडी पोलिस ठाणेदार आनंद वाकदकर यांच्या मार्गदर्शनात अवधूतवाडी डीबी पथकाचे प्रमुख संदीप मुपडे, एलसीबी सहायक पोलिस निरीक्षक मनोज लांडगे आणि सुधीर पुसदकर, सलमान शेख, रितुराज मेढवे, सुरेश मेश्राम, परशुराम अंभोरे
यांच्यासह डीबी पथकाच्या कर्मचार्‍यांनी पार पाडली.