सनीने अमेरिकेत घेतला बंगला

    दिनांक :16-Jul-2019
बॉलिवूडची वाट धरलेली अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. नृत्यकौशल्य आणि सौंदर्य यांच्या बळावर तिने कलाविश्वामध्ये आपलं स्थान भक्कम केलं. बॉलिवूड चित्रपटांनंतर सनीने तिचा मोर्चा मल्याळम चित्रपटांकडे वळविला आहे. लवकर ती एका मल्याळम चित्रपटामध्ये झळकणार आहे. त्यामुळे आता सनी भारतामध्ये चांगलीच फेमस झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही वर्षांपूर्वी भारतात येऊन येथेच स्थायिक झालेल्या सनीचा अमेरिकेमधील लॉस एंजोलिसमध्ये एक मोठा बंगला आहे. तिच्या या घराचे काही फोटो तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत.
 
 
लॉस एंजलोसिमधील Sherman Oaks येथे सनी आणि डॅनियल वेबरचा एक ५ बीएचके बंगला आहे. हा बंगला प्रचंड मोठा आणि प्रशस्त आहे. त्यांचं हे घर Beverly Hills पासून अवघ्या ३० मिनिटांच्या अंतरावर आहे. विशेष म्हणजे सनीने हा बंगला तिच्या ३६ व्या वाढदिवशी खरेदी करत स्वत: ला गिफ्ट केला आहे.
 
 
सनीने हे घर विकत घेतल्यानंतर एक गणपती बाप्पाची मूर्तीही खरेदी केली आहे. सनीने तिच्या घराचे आणि या मूर्तीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यासोबत सनीने हे घर सजविण्यासाठी खास इटली,रोम आणि स्पेनवरुन काही गोष्टी खरेदी केल्या आहेत.