हेमा मालिनींच्या 'त्या' ट्वीटवर धर्मेंद्र यांची माफी

    दिनांक :17-Jul-2019
मुंबई,
खासदार हेमा मालिनी यांचा संसदेच्या आवारात झाडू मारतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर नेटकऱ्यांनी हेमा मालिनी यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. तर, अभिनेते धर्मेंद्र यांनीही हेमा मालिनी यांची खिल्ली उडवणार ट्वीट केलं होतं. त्यांच्या या ट्वीटमुळं हेमा मालिनींच्या भावना दुखावल्या गेल्याचं बोललं जातं आहे. धर्मेंद्र यांना त्यांची चूक लक्षात येताच त्यांनी त्यांच्या व्यक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.
 
 
ट्वीटरवर हात जोडलेला एक फोटो शेअर करत त्यांनी माफी मागितली आहे. 'मी कधी कधी काहीही बोलतो.' असं कॅप्शनही त्यांनी दिलं आहे.
 
हेमा मालिनी यांच्या झाडू मारण्याविषयी यूजरने त्यांचे पती धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया विचारली. 'सर, हेमा मॅडमने यापूर्वी कधी झाडू हातात घेतला होता का?' असा थेट सवाल त्याने धर्मेंद्र यांना केला होता. त्यावर त्यांनी 'हो, चित्रपटात. या व्हिडिओत मलासुद्धा ती 'अनाडी'च वाटली.अशी प्रतिक्रीया दिली होती.