नवजीवन एक्सप्रेस मधून पडून अकोल्यातील दोघांचा मृत्यू

    दिनांक :18-Jul-2019
अकोला,
अकोल्यातील काही युवक तिरुपती बालाजीला दर्शनाला जात असताना नवजीवन एक्सप्रेस मधून खाली पडून दोघांचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना वर्धा ते हिंगणघाट दरम्यान आष्टा (भुगाव) जवळ बुधवार (17 जुलै)च्या रात्री 11.30 वाजता घडली. या घटनेत अकोल्यातील सागर बगाडे व सारंग नाटेकर या दोघांचा मृत्यू झाला. 
 
 
हे दोघे रेल्वे डब्याच्या गेटवर बसून प्रवास करीत होते ते दोघे पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर मित्रांनी हिंगणघाट रेल्वे पोलिसांना ही माहिती दिली. पोलिस ट्रॅक शोधत आले असता आष्टा गावाजवळ ट्रॅकवर दोन जण पडून असल्याचे दिसले. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला असून मृतदेहांचे शवविच्छेदन सेवाग्राम शासकीय रुग्णालयात करण्यात आले. शवविच्छेदनांनंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. 
 

 
 
याबाबत सेवाग्राम पोलिस स्टेशनमध्ये रेल्वेच्या डब्यातून पडून मृत्यू झाल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून  पोलिस पुढील तपास करीत आहेत. सेवाग्राम पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस. जी. बोथे यांनी दिली.