माधव आणि हिनामधील वाद विकोपाला

    दिनांक :18-Jul-2019
मुंबई,
बिग बॉसच्या घरात सतत लहान सहान गोष्टींवरून वाद होत असतात. सध्या हिना, नेहा आणि माधव यांच्यात मैत्रीत फूट पडली आहे. शिवानी घरात पुन्हा आल्यामुळं नेहा आणि माधव हिनाला डावलत असल्याचं तिचं म्हणणं आहे. माधव आणि हिनामध्ये एका लहान कारणांवरून वाद निर्माण झाला आहे.
 
 
कालच्या भागात घरातील सदस्यांना मर्डर मिस्ट्री टाक्स दिलं होतं. या कार्यात सदस्यांचा सांकेतिक खून करण्यात येणार आहे. सांकेतिक खून करण्यासाठी सदस्यांची एक वस्तू लपवण्यात येणार आहे. कोणीतरी हिनाची पर्स लपवून ठेवणार आहे आणि हेच माधव हिनाच्या वादाचं कारण ठरणार आहे.
माधवनंच आपली पर्स लपवली अशी शंका आल्यानं हिना त्याला जाब विचारायला गेली. तू मला माझी पर्स काढून दे असं ती त्याला सांगते. मात्र, हिनाच्या पर्सला हात लावल्यावर आपला खून होईल अशी भीती माधवला आहे. त्यामुळं तो तिची पर्स काढून द्यायला तयार होत नाही. यावरूनच त्यांच्यात मोठा वाद झाला. वीणाची पर्स लपवणे हा टास्कचा भाग आहे की कोणी तिची गंमत करतेय हे आजच्या भागातच कळेल.