अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगल’चा ट्रेलर लॉन्च

    दिनांक :19-Jul-2019
नवी दिल्ली,
अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू आणि सोनाक्षी सिन्हा अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित 'मिशन मंगल' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. इस्रोच्या वैज्ञानिकांच्या 'मिशन मंगल' म्हणजे मंगळ ग्रहावर पोहोचण्यासाठीचे प्रयत्न आणि जिद्द यावर हा सिनेमा आहे.

 
प्रामुख्याने वैज्ञानिक राकेश धवन आणि तारा शिंदे यांच्यावर आधारित हा सिनेमा आहे. या वैज्ञानिकांनी मंगळवर सॅटेलाईट पाठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अक्षय कुमारने सिनेमाचा ट्रेलर ट्विटरवर शेअर केला आहे. ही फक्त गोष्ट नाही, तर एक उदाहरण आहे. अशक्य स्वप्न भारताने खरं केलं. मिशन मंगलचा ट्रेलर रिलीज झाला आहे, असं अक्षयने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
 
 
ट्रेलरमध्ये अक्षय कुमार मिशन मंगलसाठी आपल्या टीममध्ये उत्साह वाढवताना दिसत आहेत. ट्रेलर सर्वांना आवडला आहे, तशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. "बिना एक्सपिरिमेन्ट के कोई सायन्स नही है, एक्सपिरिमेंट नहीं करेंगे तो हमें अपने आपको सायंटिस्ट कहने का कोई हक नहीं, अक्षयच्या अशा दमदार डायलॉगने सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात झाली आहे.
अक्षय कुमार सिनेमात राकेश धवन यांची भूमिका साकारत आहेत. तर विद्या बालन- तारा शिंदे, सोनाक्षी सिन्हा- एका गांधी, तापसी पन्नू- कृतिका अग्रवाल, शर्मन जोशी- परमेश्वर नायडू, नेहा सिद्दिकी- कृति कुल्हारी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. येत्या 15 ऑगस्ट 2019 रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जगन शक्तीने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.