सारखी सर्दी होतीये?

    दिनांक :19-Jul-2019
सर्दी बरेचदा पिच्छा सोडत नाही किंवा आगंतूक पाहुण्यासारखी येऊन ठाण मांडते. रोगप्रतिकारक शक्ती कमी असणार्‍या लोकांना सर्दी-पडशाचा सतत त्रास होत असतो. सतत अँटीबायोटिक औषधं घेऊन होणारं तब्येेतीचं नुकसान टाळण्यासाठी, सर्दीवर आराम पडण्यासाठी आजीच्या बटव्यातील काही उपाय... 

 
  • आलं-तुळशीचा काढा- तुळशीच्या पानांसोबत आलं कुटून घ्या. एक ग्लास पाण्यामध्ये मिसळून त्याचा काढा मधाबरोबर घेतल्यास सर्दीमध्ये पटकन आराम मिळतो. आल्यामुळे शरिरातील उष्णता वाढीस लागते तर तुळशी हे सर्दीचा संसर्ग रोखण्याचे काम करते.
  • लवंग तुळशीचा काढा- तुळशीच्या सात ते दहा पानांसोबत चार लवंगा कुटून थोड्याशा पाण्यासोबत उकळून घ्या. त्यात सैंधव मीठ घालून प्यायल्याने सर्दी कमी होतेच शिवाय तुळशीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
  • आलं इलायचीचा काढा- अर्धा इंच आलं, सहा ते सात इलायचीसोबत कुटून घ्या. ते एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्या. हे मिश्रण गाळून, मध घालून त्या काढ्याचं सेवन करा.
  • दालचिनी मधाचा काढा- एका भांड्यामधे पाणी घेऊन गरम करा. अर्धा चमचा दालचिनी पावडर घालून ते उकळून घ्या. कोमट झाल्यानंतर त्यात मध टाकून सेवन करा.