'साहो' प्रदर्शनाची तारीख बदलली

    दिनांक :19-Jul-2019
मुंबई,
दाक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या 'साहो' या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात भरपूर उत्सूकता आहे. 'साहो' येत्या १५ ऑगस्टला देशभरात प्रदर्शित होणार होता. मात्र, प्रदर्शनाची तारीख बदलुन ३० ऑगस्ट ही तारीख नक्की करण्यात आली आहे.
 
 
'साहो' हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होईल अशी अधिकृत घोषणा चित्रपटाच्या निर्मात्यांनी केली होती. पण, येत्या १५ ऑगस्टलाच अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' आणि जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' हे चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या चित्रपटांशी होणारी स्पर्धा टाळण्यासाठी 'साहो' च्या प्रदर्शनाची तारीख बदलली असल्याची चर्चा होत आहे.
 
 
यूव्ही क्रिएशन्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून बदललेल्या तारखेची माहिती देण्यात आली असून हा चित्रपट ३० ऑगस्टला प्रदर्शित होईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सिनेरसिकांना 'साहो' बघण्यासाठी आणखी १५ दिवस वाट पाहावी लागेल.