लक्ष वेधणारी विंडीज संघाची चाहती

    दिनांक :02-Jul-2019
चेस्टर ली स्ट्रीट,
चेस्टर-ली स्ट्रीटच्या रिव्हरसाईड मैदानावर सोमवारी वेस्ट इंडीजला प्रोत्साहन देणार्‍या कि‘केटप्रेमींमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारी एक फॅशनेबल चाहती दिसली. ही स्टायलिश चाहती आहे, जागतिक कीर्तीची पॉप गायिका रिहान्ना. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान मरून रंगाचा पोषाख परिधान करून खेळणार्‍या जेसन होल्डरच्या विंडीज संघाला रिहान्ना प्रोत्साहन देत होती. 
 
 
विंडीजने 23 धावांनी हा सामना गमावला असला तरी सामन्याच्या अखेरपर्यंत तिने संघाला प्रोत्साहन दिले. सामन्यानंतर सुपरस्टार रिहान्नाने ख्रिस गेल व विंडीज संघाच्या सर्व सदस्यांची भेट घेतली. यावेळी रिहान्नाला विंडीज संघाची कॅप व ख्रिस गेलची स्वाक्षरी असलेली बॅट भेट म्हणून प्रदान करण्यात आली.
वेस्ट इंडीज आधीच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाला असून आता त्यांचा शेवटचा सामना 4 जुलै रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.