भाजपाच्या वतिने १०१ गावांना पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे वाटप.

    दिनांक :02-Jul-2019
चिखली: भारतीय जनता पार्टी बुलडाणा जिल्हा चिखली विधानसभा क्षेत्राच्या वतीने मतदारसंघातिल १०१ गावांना पाण्याच्या टाक्यांचे वाटप दि. १ जुलै २०१९ रोजी कृषीदिनाच्या पर्वावर करण्यात आले. भाजपा जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड विजय कोठारी, सतिषजी गुप्त, रामकृष्णदादा शेटे, श्वेताताई महाले, सुरेशआप्पा खबुतरे, कुणाल बोंद्रे, संजय चेकेपाटील, पंडीतराव देशमुख,ॲड मंगेश व्यवहारे, सुधाकर काळे, अशोक अग्रवाल यांच्या संकल्पनेतुन व स्वखर्चाने साकार झालेल्या या उपक्रमामुळे चिखली तालुक्यातील १०१ गावांतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
 मागील काही दिवसांपासून संपुर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असतांना बुलडाणा जिल्हादेखील त्याला अपवाद नव्हता. या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील नागरिकांला पाण्याचा प्रश्नं भेडसावत होता. यासंदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांनी ॲड विजय कोठारी व सहकारी भाजप नेत्यांना या समस्येबाबत अवगत करुन दिल्यानंतर त्यांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी व पाणी साठविण्याचा एक सोपा मार्ग म्हणून १००० लिटर पाणी साठवण क्षमता असलेल्या सिनटेक्स टाक्या वाटण्याची योजना बनवली. व त्यानुसार आज १०१ गावांना १०१ पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की विधानसभेच्या तयारीला पाणीसाठवण टाकी वाटपाच्या कार्याने सुरवात आहे.. भाजप हा लोकशाहीवर चालणारा पक्ष असल्याने उमेदवारीचे इच्छुक जास्त असले तरी विजय आपलाच आहे.. परिश्रमाशिवाय ते शक्य नाही. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या साठवणाची मोठी समस्या असते. ती लक्षात घेऊन आपल्या पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने ही गरजेची बाब पुर्ण केली.. विधानसभेच्या तयारीला या सामाजिक कार्याने सुरवात होने हे शुभलक्षण आहे असेही त्यांनी सांगितले.
स्थानिक आनंद मंगल कार्यालयाच्या मैदानात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा प्रदेश कार्यकारीनि सदस्य ॲड.विजय कोठारी, जि.प. सदस्या सौ. श्वेताताई महाले,नगराध्यक्षा सौ. प्रियाताई बोंद्रे, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतिश गुप्तं, शि.प्र.म. चे अध्यक्ष रामकृष्ण्ंदादा शेटे, न.प. उपाध्यक्षा वजिराबी शे अनिस, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. मंगेश व्यवहारे, संजय चेके पाटील, डॉ. प्रतापसिंह राजपुत, सुधाकर काळे, पंडीतराव देशमुख, विधानसभा क्षेत्र विस्तारक अजय बिडवे, रामदास भाऊ देव्हडे, कुणाल बोंद्रे, अशोक अग्रवाल, नगरसेवक अर्चना खबुतरे, गोपाल देव्हडे, अनुप महाजन, सुदर्शन खरात, गोविंद देव्हडे, नामदेव गुरुदासाणी, विजय नकवाल, मंगला झगडे, सुनिताताई सिनगारे, सिंधुताई तायडे, सुरेखाताई गवई, नारायण भवर, अमोल साठे यांचेसह परिसरातील व ग्रामीण भागातील भाजपाचे चिखली विधानसभा क्षेत्राचे सर्व बुथप्रमुख,कार्यकर्ते व पदाधिकारी व नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन भाजपा शहराध्यक्ष सुरेंद्रप्रसाद पांडे यांनी केले.