हिमेशच्या कारचा अपघात

    दिनांक :02-Jul-2019
सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक व गायक हिमेश रेशमियाच्या कारचा मंगळवारी सकाळी अपघात झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई- पुणे- महामार्गावर हा अपघात झाला आहे. हिमेशच्या गाडीचा चालक राम रंजन हा मूळचा बिहारचा रहिवासी असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हा प्रसंग नेमका कसा घडला याविषयी चौकशी सुरू आहे.
 
 
हिमेशने आतापर्यंत अनेक गाणी गायली असून त्याची गाणी तरुणाईमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. ‘आप का सुरूर’, ‘कर्ज’, ‘खिलाडी 786’ आणि ‘द एक्सपोज’ या चित्रपटांमध्ये त्याने कामही केले आहे. ‘आशिक बनाया आपने’, ‘झलक दिखला जा’, ‘तेरा सुरूर’ ही त्याची गाणी विशेष लोकप्रिय आहेत.
सध्या हिमेश एका रिऍलिटी शो चे परीक्षण करत आहे. ‘सुपरस्टार सिंगर’ या रिऍलिटी शोसाठी सुरू असलेल्या ऑडिशनमध्ये हिमेश म्हणाला होता की, “मला प्राण्यांची खूप भीती आहे. मी त्यांच्यापासून चार हात लांबच असतो.” याआधी त्याने ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’, ‘द व्हॉइस ऑफ इंडिया किड्स’ या कार्यक्रमांचे परीक्षण केले होते.