भारताचा बांगलादेशवर विजय

    दिनांक :02-Jul-2019
 आज भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यांमध्ये भारताने आपली विजयी घोडदौड कायम राखत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.  सलामीवीर रोहित शर्माचे शानदान शतक (१०४), लोकश राहुलचे अर्धशतक (७७) आणि ऋषभ पंतच्या (४८) धावांच्या बळावर भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी ३१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. एकवेळ रोहित शर्मा आणि लोकश राहुल खेळपट्टीवर असताना भारत यापेक्षाही मोठी धावसंख्या उभारेल असे वाटले होते. पण रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मोठी भागीदारी होऊ शकली नाही. ठराविक अंतराने विकेट गेल्या. त्यामुळे चांगल्या सुरुवातीनंतरही भारताला विशाल धावसंख्या उभारता आली नाही. ३१५ धावांचे आव्हान असलेल्या बांगलादेशने संथ पण सावध सुरूवात केली, परंतु बुमराहच्या गोलंदाजीने त्यांचा धुव्वा उडविला.