मनसेकडून महापौरांना भिंगाचा चष्मा भेट

    दिनांक :02-Jul-2019
 

 
 
मुंबई: कालपासून धो-धो बरसणाऱ्या पावसाने मुंबईची पार दैना करून टाकली आहे. जागोजागी पाणी साचले असतांना.  पावसाने मुंबई कुठे तुंबली आहे? असे वक्तव्य मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सोमवारी केले  होते.  यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना जाड भिंगाचा चष्मा भेट म्हणून पाठवला. तुंबलेली मुंबई निदान महापौरांना या जाड भिंगाच्या चष्म्यातून तरी दिसेल असे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले. यासंदर्भात मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्या व्हिडिओतून मनसेने महापौरांवर निशाणा साधला आहे.