घरघुती कलहातून विवाहितेची हत्या

    दिनांक :02-Jul-2019
हिंगणघाट: स्थानिक यंशवत नगर येथील रहिवासी दिपा सुनिल खियान हिची कौटुंबिक वादातुन निर्घुन हत्या करण्यात आली. या   घटने शहरात खळबळ माजली आहे.  दिपा हिचा तीच्या सख्खा पुतण्या विरु गोपीचंद खियानी यानेच ही हत्या केली. लोंखडी रॉडने मृतक काकुच्या डोक्यावर व पाठीवर जोरदार वार करुन तीची घटना स्थळीच हत्या केली.
नंतर दिपाच्या पतीस माहीती मिळताच तो तातडीने घरी आला. नंतर पती सुनिलने आपल्या पत्नीस उपजिल्हा रुग्नालयात घेऊन गेला तिथे डाॅक्टरांनी तीला मृत घोषीत केले.

 
 
दिपा तीचा पती सुनिल तसेच पुतण्या विरु गोपीचंद खियानी वय वर्ष २५ हे एकाच घरात राहायचे त्यांचा डेकोरेशनचा आणि बिछायतचा एकत्रीत व्यवसाय होता, एकाच घरी खाली-वर राहायचे वर जाण्यासाठी एकच जिना होता. हाच वादाचा विषय होता, त्या रस्ताच्या वादातुन नेहमी  दिपा सोबत वाद व्हायचा या वादातुनच हे हत्याकांड घडले.
या आधी सुध्दा याची भांडणे व्हायची त्याची हिंगणघाट पोलीसात नोंद असल्याची माहीती मिळाली आहे. संशयीत आरोपी विरु हा त्याचा काका सुनिल याच्या सांगण्यावरून नेहमी दिपाला मारहान करायचा अशी चर्चा आहे.