सुलतानपुर पुलाचे एकाच पाण्यात तिन तेरा

    दिनांक :02-Jul-2019
हिंगणघाट: तालुक्यातील जवळच असलेल्या सुलतानपूर शिवारातील नाल्यावरील पुल मागिलवर्षी सेप्टेंबर महिन्यात अतिवृष्टिमुळे वाहून गेला होता. त्यावेळी येथील ग्रामस्थांनी आमदार कुणावार यांची भेट घेऊन संपूर्ण माहिती देत निवेदन दिले परंतु वर्षभर लोटून सुद्धा अध्याप कोणतीही कारवाही झाली नाही.
 

 
 
यामुळे शालेय विद्यार्थी व नागरिकांना ये जा करण्यास खुप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. शनिवारी सायंकाळी कंपनीतून येणाऱ्या मजुराची एक दुचाकीसुद्धा पुलावरून वाहुन जाण्याचा प्रकार घडला. या करीता सुलतानपुर गावातील नागरिकांनी व उमरी ग्रामपंचायतने आमदार समिर कुणावार यांना निवेदन दिले आहे . परंतु कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या पुलाचे काम तात्काळ करण्यात यावे अन्यथा सुलतानपुर गावातील नागरिक तिव्र आंदोलन करनार असल्याचा असा ईशारा सुलतानपुर वासियांनी दिलेला आहे.