नाशिक: पाण्याची टाकी कोसळून तिघांचा मृत्यू

    दिनांक :02-Jul-2019
नाशिक: नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या अपना घर या गृहप्रकल्पाचे काम सातपूर या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी पाण्याच्या व्यवस्थेसाठी दोन जलकुंभ तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आले होते. त्यापैकी एका टाकीला गळती लागली होती. मात्र आज ही टाकी कोसळली या टाकीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने तिघांचा मृत्यू झाला. तिघांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
 
 
सदर घटनेची माहिती मिळताच सातपूर अग्निशमन उपकेंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला. तिथे मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं. या ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत बाहेर काढण्यात आलं. मात्र तिघांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तिघांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. आज विधानसभेत पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे यावेळीही.