दोन शाळकरी मुले पुराच्या पाण्यात गेली वाहून

    दिनांक :02-Jul-2019
वाघी बुद्रुक येथील दुर्दैवी घटना
मालेगाव : तालूक्यातील शिरपुर (जैन ) पासून जवळच असलेल्या शिरपूर -आसेगाव रोड वरील वाघी बुद्रुक येथील शाळकरी मुले नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची दुर्दैवी घटना 2 जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली.

 
 
आज दुपारी दरम्यान मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने परिसरातील नाला परी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने नाला ओथंबून वाहत होता. शिरपूर - आसेगाव रोडवरील ग्राम वाघी बुद्रुक येथील चार शाळकरी मुले शाळेमधून घरी जात असताना नाल्याला एकदमच पाणी आल्याने चारही मुले नाल्याच्या खाली पाण्यामध्ये पडली, त्यामधील दोन मुलांना ग्रामस्थांनी बाहेर काढले व मात्र पूजा बाळू पवार व तिचा भाऊ पारस बाळू पवार ही दोन्हीही बहीण भाऊ पाण्यामध्ये वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली पूजा ही आठव्या वर्गात शिकत होती तर तर पारस हा दुसऱ्या वर्गात शिकत होता सदर नाल्यावर बांधलेल्या पुलावर कठडे नसल्याने सदर अपघात, दुर्घटना घडली असल्याचे ग्रामस्थांच्यावतीने बोलले जात आहे त्या दोन्ही मुलांना वाचवण्यासाठी ग्रामस्थ शर्तीचे प्रयत्न करित होते घटनेची माहिती मिळताच शिरपूर पो स्टेशनचे पीएसआय राहुल गुहे घटनास्थळी पोहोचले वृत्त लिहीपर्यंत शोध मोहीम सुरू होती.
सुदैवाने दोन चिमुकल्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी सतर्कतेने गावकऱ्यांमा यश मिळाले,मात्र दोन बहिण-भावांचा शोथ गावकरी तथा परिसरातील नागरीकासह शिरपूर पोलिस कसून शोध घेताहेत