कसं करावं हनुमान चालिसाचं पठण?

    दिनांक :20-Jul-2019
हनुमान ही देवता बलदायी आणि भयनाशक आहेे. मारूती स्तोत्र आणि हनुमान चालीस यांच्या नियमित पठणाने अनेक अडचणी आणि दोषांपासून मुक्ती मिळते तसंच हनुमंताची कृपा प्राप्त होते. हनुमान चालीसा पठणाचे काही नियम आहे. या नियमांचं पालन केल्यास भक्तांना अनेक लाभ होतात. हनुमान चालीसाचं पठण कसं आणि कधी करावं, याविषयी... 

 
  • रात्रीच्या वेळी हनुमान चालीसा या पोथीचं पठण केल्याने अनेक दोष दूर होतात. साडेसाती मागे लागली असेल तर या उपायामुळे शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो.
  • मंगळवार आणि शनिवारी सकाळी हनुमान चालीसाचं पठण करणं लाभदायी मानलं जातं. हनुमान चालीसाच्या पठणाचे अनेक सकारात्मक प्रभाव दिसून येतात. यामुळे आरोग्य सुधारतं तसंच घरात समृद्धी आणि संपन्नता नांदू लागते. अनेक नकारात्मक गोष्टींचा प्रभाव कमी होतो.
  • हनुमाान चालीसाचं पठण सकाळी आणि रात्री करावं. रात्रीच्या वेळी आठ वेळा हनुमान चालीसा वाचल्यास साडेसातीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो.
  • हनुमानाची पूजा केल्याने शनीदेव प्रसन्न होतो. हनुमानाच्या भक्तांना शनीच्या कोपाचा त्रास होत नाही, अशीही श्रद्धा आहे. त्यामुळे हनुमानाची आराधना करायला हवी. हनुमानाची आराधना करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे हनुमान चालीसा.
  • हनुमान चालीसाच्या पठणाने भक्ताची सगळी पापं दूर होतात. हनुमंताची कृपा होते आणि जीवनात यश मिळतं.