बिग बॉसच्या घरात या अभिनेत्याची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री

    दिनांक :20-Jul-2019
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये विकेंडचा डाव रंगणार आहे. कोण या आठवड्यामध्ये चुकलं ? कोण चांगल खेळल ? कोण वाईट खेळल ? कोण स्टार परफॉर्मर बनणार ? हे महेश मांजरेकर यांनी सांगितलं. पण, आज घरामध्ये रेगे चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आणि दमदार भूमिका सादर करून मने जिंकलेला आरोह वेलणकर याची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.

 
आरोह हा मूळचा पुण्याचा आहे. आरोहने घंटा या चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. आता घरामध्ये सदस्यांचे काय म्हणणे असेल ? तो कोणत्या ग्रुपच्या बाजूने खेळेल ? की तो वैयक्तिक गेम खेळेल ? हे बघणे रंजक ठरणार आहे.