रणबीर-दीपिका पुन्हा एकत्र येणार?

    दिनांक :20-Jul-2019
मुंबई,
अभिनेता रणबीर कपूर आणि आणि दीपिका पदुकोण यांच्यात अफलातून केमिस्ट्री दिसून येते. आत्तापर्यंत दोघांनी अनेक हिट चित्रपट दिले. आता लव रंजन यांच्या आगामी चित्रपटात दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
 
दिग्दर्शक लव रंजन यांच्या आगामी चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात असलं तरी या चित्रपटासाठी दीपिकाची निवड करण्यात आल्याचं सूत्रांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. काल रात्री दीपिका आणि रणबीर लव रंजन यांच्या ऑफिसमधून एकत्र बाहेर पडले. त्यानंतर दीपिका चित्रपटात काम करत असल्याचं तर नक्की झालंच पण त्याच सोबत रणबीरही या चित्रपटात काम करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय.
या चित्रपटात अजय देवगणही काम करणार असून तो रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारेल, असा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे. या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल.