पोटच्या मुलाने केली बापाची हत्या

    दिनांक :21-Jul-2019
अकोला,
पोटच्या मुलाने बापाची डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्याच्या कानशिवणीमध्ये समोर आली आहे. या घटनेनंतर मुलगा घरातून फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

 
मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव राऊत असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी रात्री ते घरासमोरील अंगणामध्ये झोपलेले असतानाच मुलगा चंदू राऊत याने त्यांच्यावर डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान, घटनेपूर्वी दोघांमध्ये आर्थिक बाबींवरुन शाब्दिक वाद झाल्याचे समजते. या वादातूनच वडिलांची हत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या घटनेची माहिती ठाणेदार हरीश गवळी यांना मिळताच घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.