तिने विशेष मुलांसोबत केला वाढदिवस

    दिनांक :22-Jul-2019
मुंबई,
आपल्या मधाळ आवाजानं रसिकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका सावनी रविंद्रचा आज वाढदिवस. सावनी दरवर्षी तिचा सामाजिक सेवा करून साजरा करते. यंदाचा हा वाढदिवस तिनं विशेष मुलांसोबत साजरा केला.
 
 
मुंबईतील सुलभा स्पेशल शाळेतील मुलांसोबत केक कापत तिनं वाढदिवस साजरा केला. मागील वर्षी तीनं पुण्यातील वृद्धाश्रमात जाऊन वाढदिवस साजरा केला होता. तर चार वर्षांपूर्वी तिनं मुंबईतील कॅन्सरग्रस्त मुलांसोबत तिचा खास दिवस व्यतित केला होता. 'फक्त पार्टी आणि गिफ्ट घेऊन वाढदिवस साजरा करणं मला कधीचं पटलं नाही. माझ्या या खास दिवशी कोणातरी गरजु व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू यावं, असं मला वाटतं.' असं सावनी म्हणते.
सुलभा स्पेशल स्कुलच्या विद्यर्थ्यांसोबत वेळ घालवल्याच्या अनुभवाबद्दल सावनी सांगते, 'खरं तर मी या विद्यार्थ्यांना सरप्राइज द्यायला इथे आले होते. पण त्यांनी तर मलाच सरप्राइज केले. माझ्यासाठी त्यांनी गाणी गायली, डान्स केला. त्यांच्यातली निरागसता मला खूप भावली. त्यांचे निखळ हास्य माझ्या वाढदिवसाचा आनंद व्दिगुणीत करून गेलं. त्यांनी दिलेली उर्जा आता वर्षभर चांगलं काम करण्याची उमेद मला देत राहिल. '