'सुपर ३०' शंभर कोटींच्या उंबरठ्यावर

    दिनांक :22-Jul-2019
मुंबई,
अभिनेता ऋतिक रोशनचा 'सुपर ३०' सिनेमा बॉक्स ऑफिसवर शानदार प्रदर्शन करत असून या सिनेमाने १०० कोटींच्या आसपास कमाई केली आहे. दुसऱ्या विकेन्डला २३.२५ कोटींची कमवत या सिनेमाने आतापर्यंत तब्बल ९८.७५ रुपयांचा आकडा गाठला आहे.
 
 
बॉक्स ऑफिस इंडियाच्या वृत्तानुसार, 'कबीर सिंह', 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' आणि 'टोटल धमाल' या सिनेमांनंतर 'सुपर ३०' हा सिनेमा दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा यावर्षीचा चौथा सिनेमा ठरला आहे. दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या 'गली बॉय' या सिनेमाची कमाई आणि 'सुपर ३०' या सिनेमाची कमाई जवळजवळ सारखीच आहे.
'सुपर ३०' या सिनेमाची कथा ही गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयु्ष्यावर आधारित असून, या सिनेमात ऋतिक रोशनने प्रमुख भूमिका साकारली आहे. आनंद कुमार हे पाटणा येथील गणिताचे शिक्षक आहेत.गरीब विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग देत शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांनी 'आयआयटी'मध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.