शिव आणि वीणा यांच्यात अबोला?

    दिनांक :22-Jul-2019
मुंबई,
बिग बॉसच्या घरातील सर्वात चर्चित जोडी म्हणजे शिव आणि वीणा. शिव आणि वीणा यांच्यातील मैत्रीमुळं त्यांच्यात नक्की काय शिजतंय असा प्रश्न प्रेक्षकांना पडतोय. टास्कमध्येही शिव वीणाला मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. शिवच्या या वागण्यामुळं महेश मांजरेकरांनी विकेंडच्या डावात त्याची चांगलीच कानउघडणी केली. त्यामुळं शिव वीणापासून लांब राहण्याचा निर्णय घेणार आहे.
 
 
विणाला मदत करण्याच्या प्रयत्नात तु वीणाचं नुकसान करत आहेस. तसंच वीणा आता पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे असं दिसतंय. तर, तुझे खेळातील लक्ष कमी झालं आहे. असंही महेश मांजरेकर म्हणाले. यावरूनच शिव आणि वीणानं या आठवड्यापासून त्यांच्यात बदल करण्याचं वचन दिलं आहे. टास्क सुरू असताना स्वतंत्र खेळण्याचा निर्णय शिव आणि वीणा घेणार आहेत. तसंच आधी घडलेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न शिव आणि वीणा करणार आहेत. खरंच शिव आणि वीणा एकमेंकापासून न बोलता राहू शकतील का? हे आता येत्या भागात कळणार आहे.