सिल्व्हासाचा अप्रतिम नजराणा

    दिनांक :23-Jul-2019
सिल्व्हासा ही दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी. इथे पाहण्यासारखी बरीच ठिकाणं आहे. गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांच्यामध्ये हे ठिकाण आहे. एकेकाळी सिल्व्हासा पोर्तुगिजांच्या ताब्यात होतं. पश्चिम घाट आणि पर्वतरांगांमुळे इथला निसर्ग खूप सुंदर दिसतो. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी इथे यायला हरकत नाही. 
 
 
सिल्व्हासामध्ये वारली संस्कृती अनुभवता येते. वॉटर स्पोर्टसचा मनमुराद आनंद लुटण्यासाठीही तुम्ही इथे येऊ शकता. आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारं वस्तूसंग्रहालयही इथे आहे. सिल्व्हासापासून दहा किलोमीटर अंतरावर वासोना पार्क आहे. इथे लायन सफारीचं आयोजन केलं जातं. इथलं हरणांचं उद्यानही प्रसिद्ध आहे. वन्यजीवनाची आवड असणार्‍यांनी सिल्व्हासाला भेट द्यायला हवी.
 
निसर्गाच्या सानिध्यात रमणार्‍यांसाठी सिल्व्हासातलं खानवेल उत्तम ठिकाण ठरेल. साकरतोड नावाची नदी इथून वाहते. सिल्व्हापासून 40 किलोमीटर अंतरावर दुधनी नावाचं गाव आहे. इथे वॉटरस्पोर्टसचा आनंद लुटता येईल. आदिवासी लोकांशी संवाद साधून तुम्ही इथल्या संस्कृतीची ओळख करून घेऊ शकता.