समुद्राच्या नावात ‘डेड!’

    दिनांक :23-Jul-2019
निलेश जठार  
 
जगात कोणताही समुद्र घ्या. समुद्र आणि बुडणे अथवा वाहून जाणे यांचा संबंधही दाट आहे. यामुळे कुठेही त्यातही पर्यटनस्थळ असलेल्या समुद्राच्या किनार्‍यावर लाईफ गार्ड दिसतात. पोहता न येणारेच काय पण चांगले पोहणारेही अनेकदा समुद्रात बुडतात हेही आपण नेहमी ऐकत असतो. जॉर्डन व इस्त्रायल या देशांच्या सीमेवर असलेल्या या समुद्राच्या नावात ‘डेड’ शब्द आहे मात्र त्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे अजिबात पोहता न येणाराही या समुद्रात बुडत नाही म्हणजेच त्याला बुडून मृत्यू येऊ शकत नाही. आणि पट्टीच्या पोहणार्‍यांना यात पोहता येत नाही कारण माणूस येथे आपोआपच तरंगतो. हा समुद्र पृथ्वीवरील सर्वात लोएस्ट पॉईंट आहे, म्हणजे तो समुद्रपातळीखाली 1400 फूट आहे. अतिउष्णतेमुळे तो वेगाने आटत चालला आहे.
 

 
 
जॉर्डनच्या किनारी या या समुद्राला ‘डेड- सी’ हे नाव पडण्यामागचे कारण म्हणजे यात क्षाराचे प्रमाण इतके जास्त आहे की त्यात कोणत्याही वनस्पती जगू शकत नाहीत तसेच समुद्री जीवही जगू शकत नाहीत. या क्षारांमुळे समुद्राचे पाणी अन्य समुद्रांच्या तुलनेत सात ते आठपट अधिक खारट आहे. मात्र या ठिकाणे पर्यटक भरपूर गर्दी करतात. स्वच्छ सुंदर समुद्र किनारा शिवाय पाण्यात बुडण्याची भीती नसल्याने अनेक लोक या ठिकाणाला पसंत करतात. अनेकदा या पाण्याच्या पृष्ठभागावरही मिठाचे कण जमा झालेले दिसतात. याच्या किनार्‍यावरही चिखल आहे. या समुद्राजवळची जमीनही इतकी खडकाळ व क्षारयुक्त आहे की चपला घातल्याशिवाय त्यावरून चालणे म्हणजे पायांना जखमा करून घेण्यासारखे आहे तरीही या ठिकाणी लोक का गर्दी करतात, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. अनेक डॉक्टर आपल्या पेशंटला या ठिकाणी जाण्याकरीता सुचवितात.
 
विशेष म्हणजे हा ‘डेड- सी’ पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. त्यामागचे कारण म्हणजे- या समुद्राचे पाणी व किनार्‍यावरचा चिखल औषधी गुणधर्मांनी युक्त आहेत. या पाण्यात तरंगले तर त्वचा रोग दूर होतात तसेच दम्यासह अन्य अनेक विकारांवरही आराम पडतो. येथला चिखल त्वचेवर लावून धुतल्यानंतर त्वचा ताजीतवानी होते. सुरकुत्या जातात व एक वेगळाच नरमपणा त्वचेला मिळतो. अर्थात या पाण्यात जास्त काळ राहणे हिताचे नाही िंकबहुना जास्त वेळ या पाण्यात तरंगता येत नाही. कारण क्षारांमुळे त्वचेची आग होऊ शकते. हे ठिकाण जॉर्डनच्या दक्षिणेत आहे. केवळ समुद्र किनारच नव्हे तर समुद्राच्या पाण्याने पहाडावर तयार झालेले मिठाचे पहाड आणि दगडी पहाडांवर निर्माण झालेले भोगदे फारच सुरेख आहे. या समुद्र किनारी पोहोचण्यासाठी राजधानीहून थेट बसेस सेवा आहे. शिवाय समुद्र किनारी अनेक किफायती हॉटेल्स आहेत. या ठिकाणी अधिाक करून ऑक्टोबर ते फेब्रुवारी पर्यटकांची जास्त गर्दी असते.
 
या ठिकाणी भारतीय पर्यटक फार कमी येतात मात्र ऑस्ट्रेलियन लोकांची या ठिकाणी येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ऑस्ट्रेलियात सर्वात जास्त स्किन डीसीस असल्याने त्याच्या उपचाराकरिता या ठिकाणी ऑस्ट्रेलियन लोकं जास्त प्रमाणात येतात. जॉर्डनमध्ये तुम्ही निसर्गाचा भरपूर आनंद घेऊ शकता. या ठिकाणी अतिशय सुरेख चर्च, मशीद, नॅशनल संग्रहालय, वॉर मेमोरियल पार्क, नॅशनल पार्क आणि अतिशय सुरेख असे समुद्र किनारा असे अनेक ठिकाण बघण्यासारखे आहेत. भारतातून म्हणजे दिल्लीहून थेट जॉर्डनसाठी विमान सेवा आहे. शिवाय जॉर्डन आणि भारताचे संबंध उत्तम असल्याने व्हिसा पासपोर्टसाठी जास्त कटकटी नाहीत. भारतीय रुपयांच्या तुलनेत इथली करन्सी फारच स्वस्त आहे. म्हणजे एक भारतीय रुपयात तुम्हाला 98 जॉर्डन दिनार मिळेल. तसाही खर्चाच्या बाबतीत हा देश फार स्वस्त आहे. जॉर्डनला तसा पाऊस कमी होतो. त्यामुळे वर्षातले 7 महिने तुम्ही जॉर्डनची सफर करू शकता. जॉर्डन हा एक लोकतांत्रिक देश जरी असला, तरी सत्ता ही एका राज्यकारभारात चालते शिवाय बाकी अमिरातपेक्षा इथले नियम वेगळे आहेत आणि ते पर्यटकांच्या दृष्टीने फार मैत्रीपूर्ण आहे, हे विशेष!