दाक्षिणात्य चित्रपटातून करणार आर्यन खान पदार्पण

    दिनांक :23-Jul-2019
'द लायन किंग' चित्रपटातील 'सिंबा' या पात्राला आर्यन खाननं आवाज दिल्यानंतर आर्यन सिनेसृष्टीत कधी पदार्पण करतोय याकडं शाहरुखचे चाहते डोळे लावून बसले आहेत. करण जोहर आर्यनला सिनेसृष्टीत लाँच करणार असल्याच्या चर्चाही मध्यंतरी रंगल्या होत्या. आता मात्र आर्यन दाक्षिणात्य चित्रपटातून एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे.

 
 
 टॉलिवूडचे दिग्दर्शक गुनाशेखर यांनी 'हिरण्यकश्यपु' चित्रपटाची घोषणा केली आहे. बाहुबलीसारखाच भव्यदिव्य हा चित्रपट असणार आहे. तर, या चित्रपटासाठी आर्यन खानचा विचार करण्यात येत असल्याचं वृत्त आहे. 'हिरण्यकश्यपू'मध्ये प्रल्हादच्या भूमिकेसाठी आर्यन खानची निवड करण्यात आली आहे. मात्र, अद्याप त्याच्या भूमिकेवर कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं दिग्दर्शकांनी सांगितलं आहे.
या चित्रपटात प्रभास आणि राणा दग्गुबातीदेखील दिसणार आहेत. बाहुबलीमध्ये प्रभासनं अमरेंद्र बाहुबलीची भूमिका साकारली होती. तर, राणा दग्गुबत्ती भल्लालदेवच्या भूमिकेत दिसला होता.