'तुला पाहते रे'साठी सुबोधला मिळाले इतके मानधन

    दिनांक :23-Jul-2019
अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली 'तुला पाहते रे' या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी अजूनही प्रेक्षक विक्रांत आणि ईशा अजूनही पेक्षकांच्या मनात कायम आहेत. विक्रांत सरंजामे आणि ईशा निमकरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले. मालिकेसाठी कलाकारांनी खूप मेहनतही घेतली होती. मराठी सिनेसृष्टीत सुबोध आघाडीचा कलाकार आहे. इतर कलाकारांच्या तुलनेत त्याला मानधनही जास्त मिळतं. 'तुला पाहते रे'साठी सुबोध भावेनं कीती मानधन घेतलं हे समोर आलं आहे.

 
 
मेहनतही घेतली होती. मराठी सिनेसृष्टीत सुबोध आघाडीचा कलाकार आहे. इतर कलाकारांच्या तुलनेत त्याला मानधनही जास्त मिळतं. 'तुला पाहते रे'साठी सुबोध भावेनं कीती मानधन घेतलं हे समोर आलं आहे.
सूत्रांनुसार, 'तुला पाहते रे'च्या प्रत्येक एपिसोडपमागे सुबोधला ३५ हजार इतकं मानधन दिले जात होते. दरम्यान, सुरुवातीला मालिका फक्त २००-२५० भागात संपवण्यात येणार होती. मात्र, प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद बघून मालिकेनं ३०० भागांचा टप्पा गाठला.
विक्रांत सरंजामे हे पात्र फक्त सुबोध साकारु शकेल असा विश्वास निर्मात्यांना होता. जर सुबोधनं मालिकेसाठी नकार दिला तर मालिका पुढे जाणार नाही. असं निर्मात्यांनी वाहिनीला सांगितलं होतं. मात्र, सुबोधनं कथा ऐकून लगेचच मालिकेसाठी होकार कळवला आणि मालिकेचे शूटिंग सुरू झाले.