उलगडणार सरसेनापती हंबीररावांचा जीवनप्रवास

    दिनांक :25-Jul-2019
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा मान मिळविणारे 'हंबीरराव मोहिते' यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. लेखक, अभिनेता, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटाची घोषणा केली आहे.
 
 
'तुटुन पडला जरी हात, नाही सोडली तलवारीची साथ....' अशी टॅगलाइन असलेले पोस्टर प्रविणनं काही दिवसांपूर्वी पोस्ट केलं होतं. तर, चित्रपटासाठीच्या लोकेशन पाहणीला व ड्रोन शुटिंगला सुरूवात झाली आहे. चित्रपटाचे पोस्टर व त्यावरील टॅगलाइन पाहून हा चित्रपट भव्यदिव्य असणार यात काही शंका नाही. मात्र, अद्याप हंबीरराव मोहिते यांची भूमिका कोण साकारणार हे गुलदस्त्यात आहे.
'मुळशी पॅटर्न'नंतर प्रविण कोणता चित्रपट घेऊन येणार याविषयी उत्सुकता होती. आता ती उत्सुकता संपली आहे. जानेवारी २०२०मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाउंडेशन करत असून संदिप रघुनाथराव मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडेचे असणार आहेत.