‘द लायन किंग’ने केली ६९.६७ कोटींची कमाई

    दिनांक :25-Jul-2019
१९९४ मध्ये आलेल्या मूळ ‘द लायन किंग’चा रिमेक असलेला ‘द लायन किंग’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट लाइव्ह अ‍ॅनिमेशन अवतारात असून बच्चेकंपनीच्या पसंतीत उतरत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात चांगली कमाई केली असून आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल ६९.६७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
 

 
 
१९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा चित्रपट भारतात हिंदी, इंग्रजी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित झाला.आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेऊन जंगलावर आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी लढणाऱ्या सिम्बाची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
या चित्रपटाने आतापर्यंत ६९.६७ कोटी रुपयांची कमाई केली असून हा चित्रपट लवकरच १०० कोटींचा टप्पा गाठेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ११.६ कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी १९.१५ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी २४.५४ कोटी रुपये, चौथ्या दिवशी ७.९० कोटी रुपये, पाचव्या दिवशी ७.०२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
दरम्यान, ९० च्या दशकामध्ये बच्चेकंपनीला वेड लावणारा हा सिम्बा आजच्या लहान मुलांच्या विस्मृतीत गेला आहे. त्यामुळेच या लहानग्यांना पुन्हा एकदा सिम्बाची नव्याने ओळख व्हावी यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली.