प्रियांका-निकचं लग्न म्हणजे इंग्रजांकडून लूट – कपिल शर्मा

    दिनांक :25-Jul-2019
येत्या वीकेंडला ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा या जोडीला पाहुणे म्हणून बोलवण्यात आले आहे. शोचा नुकताच प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये कपिल शर्मा परिणीती चोप्रासह मस्ती करताना दिसत आहे. दरम्यान कपिलने निक जोनासा भेटून एक खास गोष्ट सांगायची असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.
 
 
सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये ‘परिणीती तू हंसी तो फंसी हा चित्रपट केला होतास. तु आता इतकी हसली आहेस तरी फसली का नाही. जर असं झालं असते तर आज माझा साडू निक जोनास असता’ असे कपिल परिणीतीला म्हणाला आहे. त्यावर सिद्धार्थने ‘परिणीतीला कपिल आणि निकची भेट घालूनच दे’ असे म्हणाला आहे.
थोड्या वेळात परिणीती कपिलला ‘तू निकला भेटलास तर काय विचारशील’ असा प्रश्न विचारते. त्यावर कपिलने मजेशीर उत्तर दिले आहे. ‘तुझी निवड खूप चांगली आहे. पुन्हा आपल्याला इंग्रजांनी लुटले’ असे उत्तर कपिल शर्माने दिले आहे. कपिलचे हे उत्तर ऐकून सर्वत्र हास्याची लाट पसरल्याचे दिसत आहे.
सध्या परिणीती आणि सिद्धार्थ ‘जबरियाँ जो़डी’ या चित्रपटामध्ये व्यग्र आहेत. हा एक रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपट आहे. प्रशांत सिंद दिग्दर्शत ‘जबरियाँ जोडी’ या चित्रपटाचे बालाजी टेलिफिल्म्स आणि कर्मा मिडिया एंटरटेन्मेंट सह- प्रस्तुतकर्ते आहे. याआधी २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हसी तो फंसी’ या चित्रपटात सिद्धार्थ- परिणीतीने एकत्र काम केल़े होते. ही जोडी तेव्हाही प्रेक्षकांना खूप आवडली होती. तेव्हा आणखी एक अनोखी कथा घेऊन पुन्हा एकत्र येणाऱ्या या जोडीचा हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत आवडतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ आणि परिणीतीसह संजय मिश्रा, नीरज सूद, जावेद जाफरी हे कालाकार देखीलल दिसणार आहेत.