रविनाने घेतली अमेयच्या 'गर्लफ्रेंड'ची भेट

    दिनांक :25-Jul-2019
मुंबई,
अभिनेता अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांचा 'गर्लफ्रेंड' चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. हा चित्रपट येत्या २६ जुलैला प्रदर्शित होतोय. त्याआधी सिनेमाचं एक स्क्रिनिंग आयोजित केलं होतं. या स्क्रिंनिंगला बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडननं हजेरी लावली. रविनाला अमेयचा हा चित्रपट भारीच आवडला आहे. खुद्द अमेयनंचं तसं सांगितलं आहे.

 
 
 
अमेयच्या चाइल्डहूड क्रशनं त्याचा 'गर्लफ्रेंड' सिनेमा पाहिल्यानंतर तो भलताच खुश होता. त्यानं लगेच इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत, रविनानं 'गर्लफ्रेंड' बघितला आणि तीला खुप आवडला' ही खुशखबर चाहत्यांना दिली.
'गर्लफ्रेंड' चित्रपटात अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्यासह सागर देशमुख, रसिका सुनील, ईशा केसकर, कविता लाड, यतीन कार्येकर, तेजस बर्वे, सुयोग गोऱ्हे, उदय नेने यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन उपेन्द्र सिधये यांनी केलं आहे.