अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाची हत्या

    दिनांक :26-Jul-2019
भामरागड, 
पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून इसमाची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना तालुक्यातील ताडगाव येथे घडली आहे. जुरू बंडू आत्राम  असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून आरोपी रामा कुडयामी हा फरार झाला आहे. सदर घटना आज २५ जुलै रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार मृतक जुरू आत्राम याचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी रामा कुडयामी याला होता. आज सकाळी मृतक जुरू गावातीलच एका दुकानाजवळ पेपर वाचत बसला होता. यावेळी रामा कुडयामी हा हातात कुऱ्हाड घेवून आला. त्याने जुरूच्या मानेवार वार केला. यामध्ये जुरू आत्रामचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी रामा फरार झाला आहे. भामरागड पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.