स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पोषक आहार

    दिनांक :26-Jul-2019
डॉ. प्राची तारसेकर
 
स्मरणशक्ती म्हणजेच मेंदूची क्षमता. ती वाढवणे आणि टिकवून ठेवणे, हे प्रत्येकच वयाच्या टप्प्यात गरजेचे असते. फक्त शिकणार्‍या मुला- मुलींमध्येच नव्हे तर म्हातारवयातदेखील स्मरणाक्ती चांगली असणे महत्त्वाचे. स्मरणशक्तीचे रक्षण करू शकेल, असे एकही औषध नाही. नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि पोशक आहार घेतल्याने मेंदूच्या कार्यक्तीत वाढ होऊ शकते. शारीरिक व्यायाम तर महत्त्वाचा असतोच; पण मेंदूचा व्यायाम जसे, स्मरणाक्तीचे खेळ, शब्दकोडे सोडवणे, हेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. स्मरणाक्तीसाठी पौष्टीक घटक म्हणजे अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा -3 फॅटी ॲसिड, फ्लेव्होनॉईड्स, लोह, व्हिटॉमीन बी असतात. 
 
 
अँटिऑक्सिडंट्स म्हणजेच जीवनसत्त्व अ, क, ई असलेले पदार्थ जसे गाजर, हिरव्या पालेभाज्या, लिंबू, आवळा, आंबट फळे, पिवळ्या भाज्या आणि फळे, गव्हांकूर, बदाम, ब्रोकोली इत्यादी यांचे सेवन दिवसभरात भरपूर असले पाहिजे. ओमेगा -3 फॅटी ॲसिड हे जवस, अक्रोड, सोयाबीन, मोहरी, मोहरीचे तेल, जवस तेल, मासे, चीया सीडस्‌, राजमा यांतून मिळते. ओमेगा -3 फॅटी ॲसिड हे हृदय, केस, त्वचा यांसाठीदेखील खूप उपयोगी असते.
 
फ्लेव्होनॉईड्स मिळवण्यासाठी कांदा, सफरचंद, काळी द्राक्षे, ग्रीन टी यांचे सेवन करावे. लोहदेखील मेंदूची कार्यक्षमता वाढवायला मदत करते. मांसाहारातून जे लोह मिळते ते रक्तात लवकर शोषल्या जाते, त्यामुळे ते शरीरातील इतर अवयवांना लवकर मिळते, तर शाकाहारात जे लोह असते ते रक्तात लवकर शोषल्या जात नाही. लोह मासे, मटण, अंडे, हिरव्या पालेभाज्या, आळीव, बीट, काळ्या मनुका, पेंडखजूर यांत असते. लोह जास्तीत जास्त शोषल्या जाण्यासाठी जीवनसत्त्व ‘क’ असलेले भाज्या, फळे घेणे आवयक असते.
 
जीवनसत्त्व ‘ब’ हे निरनिराळ्या भाज्या, फळे, अंकुरीत धान्य, कडधान्य, संपूर्ण धान्य, डाळी तसेच मासे, अंडे यातदेखील असते. जीवनसत्त्व ‘ब’ हे मेंदू, हृदय, धमन्या, नसा तसेच वेगवेगळ्या अंतर्गत अवयवांचे आंतील आवरण यांसाठी आवयक असते.
 
स्मरणाक्तीचा र्‍हास होणे, हे अतिशय त्रासदायक असते. त्यामुळे मेंदूला जास्तीत जास्त चालना देणे आवयक असते. वरील गोष्टींचे पालन केल्यास आपण मेंदूची कार्यशक्ती वाढवू शकतो.
• 
9527566018