बिग बॉसच्या घरात शिवानी बनलीय हिटलर

    दिनांक :26-Jul-2019
बिग बॉसच्या घरात शिवानी सुर्वेनं एन्ट्री केल्यानंतर घरात वेगळीच रंगत आली आहे. पाहुणी म्हणून आलेल्या शिवानीला आता स्पर्धकाचा दर्जा मिळाला आहे. कालच्या भागात 'सात बारा' या साप्ताहिक कार्यात शिवानी आणि वीणामध्ये चांगलाच वाद रंगला.
घरात 'सात बारा' हे साप्ताहिक कार्य सुरू आहे. या कार्यादरम्यान किशोरी शहाणेला दुखापत झाल्यामुळं शिवानी भावूक झाली आणि रडू कोसळलं. शिवानीला रडताना पाहून वीणा आणि हिनानं शिवानीना काल रडू का नाही आलं असा सवाल केला. जेव्हा तुमची टीम टास्क खेळत होती तेव्हा आम्हाला पण लागलं होतं तेव्हा का नाही शिवानीला रडू कोसळलं. असं वीणा म्हणाली. तर, शिवानी हे सगळं फक्त सहानभूती मिळवण्यासाठी करतेय असं हिना म्हणाली. हे सगळं ऐकून शिवानी चांगलीच संतापली आणि वीणाला तिच्या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी गेली. तेव्हा त्यांच्यात चांगलाच वाद रंगला.

 
 
शिवानीनं वीणाला 'माझ्यावर खासगी टिप्पणी करायची नाही. शिवानी सुर्वे कोण आहे ते पूर्ण जगाला माहितेय. माझ्याबद्दल काहीही बोलायचं नाही. मी ऐकून घेणार नाही.' असा सज्जड दम दिला. टास्क पार पाडल्यानंतर आणि शिवानीचा राग शांत झाल्यानंतर तिनं वीणासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वीणा आणि शिवानीनं यापुढं कोणाबाबतही खासगी टीका करायची नाही असा निश्चय केला आहे. सात बारा हे साप्तहिक कार्य असल्यामुळं आजच्या भागातही हे कार्य सुरू राहणार आहे.
'बिग बॉस' विषयी सर्व काही जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा
घराची कॅप्टन झाल्यानंतर शिवानीनं वीणा आणि हिनाला कुजबूज केल्यामुळं अडगळीच्या खोलीत डांबले होते. तसंच, कॅप्टन झाल्यानंतर तिनं घरात काही नियम बनवले आहेत आणि ते तिनं पाळायलाचं हवे अशी ताकीद सदस्यांना दिली आहे. शिवानी केवळ कॅप्टन असेपर्यंत असे वागणार की कायम अशीच वागत राहणार हे येत्या काही दिवसांत कळेल.