अश्लील चित्रफीत दाखवून विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास अटक

    दिनांक :27-Jul-2019
कुरखेडा, 
शाळेल्या विद्यार्थिनींना मोबाईलवर अश्लिल चित्रफित दाखवून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार कुरखेडा पंचायत समितींतर्गत जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आला. या प्रकरणी एका प्राथमिक शिक्षकास ‘पोक्सो’ कायद्यान्वये अटक करण्यात आल्याने शैक्षणिक वर्तुळात चर्चेला पेव फुटले आहे. 

 
 
श्रीकांत महादेव कुथे असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. मागील शैक्षणिक सत्रात वर्गात शिकविताना विद्यार्थिनींना मोबाईलवर अश्लील चित्रफित दाखवून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या होत्या. 
अलिकडेच गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या बालहक्क आयोगाने या तक्रारींची गंभीर दखल घेऊन पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर पुराडा पोलिस ठाण्यात श्रीकांत कुथे याच्यावर बाल लैगिंक अत्याचार कायदा कलम१२,अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा(३)(२)(५),भादंवि ३५४(अ),५०६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. काल जिल्हा व सत्रन्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली, तर आज त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी गायकवाड या प्रकरणाचा तपास करीतआहेत.