जवानी जनमान मध्ये दिसणार तब्बू

    दिनांक :27-Jul-2019
 
 
 
 सैफ अली खान सध्या त्याच्या आगामी 'जवानी जानेमन' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. नितीन कक्कर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. तर, सैफच्याच होम प्रोडक्शनमधूनच सिनेमाची निर्मिती सुरू आहे. या चित्रपटात आता अभिनेत्री तब्बूची एंट्री झाली आहे. तब्बू या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. सैफ यात वयानं मोठी असलेली एक व्यक्तिरेखा साकारत असून, त्याची जोडीदार तब्बू असेल असं दिसतंय.