‘किक’च्या सिक्वेलसाठी प्रतीक्षा

    दिनांक :27-Jul-2019
 
 
 
 
 
 सलमान खानचा 'किक' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. लवकरच या सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. प्रेक्षकांना थक्क करून टाकणारे अनेक स्टंट्स या सिनेमात तेव्हा पाहायला मिळाले होते. आता सिक्वेलमध्येही सलमान नव्या रुपात दिसेल. सुपरहिरोप्रमाणे चेहऱ्यावर मास्क धारण करून खलनायकांशी दोन हात करत त्यांना चकवा देणारा सल्लू लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पण, त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. कारण, सिक्वेलचं चित्रीकरण २०२० मध्ये सुरू होणार आहे.