सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ नागपूर कॅंपसचे थाटात उदघाटन

    दिनांक :28-Jul-2019

 
 
नागपूर,  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज दुपारी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ नागपूर कॅंपसचे उदघाटन झाले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नागपूर आणि विदर्भासाठी आजचा दिवस हा महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक आहे. अशा संस्था दर्जेदार मानव संसाधन निर्मितीत मोलाचे योगदान देत असतात, आणि विकास प्रक्रियेत मानव संसाधन हा अत्यावश्यक घटक आहे. विकास प्रक्रियेला वेग देण्यासाठी गुणवत्तापूर्ण संस्था या अतिशय महत्त्वाच्या आहेत. आज नागपूरची कार्गो हब, लॉजिस्टिक आणि नागरी उड्डयन हब म्हणून अतिशय झपाट्याने प्रगती होते आहे. या क्षेत्राला लागणाऱ्या कुशल आणि दर्जेदार मनुष्यबळाची गरज अशा संस्थांमधून पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.