महानायकाकडून एनडीआरएफचे कौतुक

    दिनांक :28-Jul-2019
मुंबई,
सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेले बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन नेहमी ट्विटरच्या माध्यमातून त्यांची मते व्यक्त करतात. अनेकदा ते इतरांच्या कामाची प्रशंसाही करताना दिसतात. त्यांनी नुकत्याच वांगणी जवळ अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याऱ्या एनडीआरएफ टीमचे कौतुक केले आहे. 

 
'एनडीआरएफचे अभिनंदन. एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या ७०० प्रवाशांची त्यांनी सुखरुप सुटका केली. एनडीआरएफ, वायुदल, नौदल यांनी चांगली कामगिरी बजावली.' असं ट्वीट अमिताभ यांनी केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, वांगणी परिसरात झालेला तुफान पाऊस आणि पुराचं पाणी रेल्वे रुळांवर आल्यानं मुंबईहून कोल्हापूरला जाणारी 'महालक्ष्मी एक्स्प्रेस' बदलापूरजवळ अडकून पडली होती.