मुसळधार पावसाने घर कोसळले

    दिनांक :28-Jul-2019
आरमोरी, 
मौजा वनखी येथे आज सकाळी मुसळदार पाऊस येत असतांना दूधराम जांभुळे यांच्या घरावर शेजारचे भाष्कर बावने यांचे घर कोसळून दुधराम जांभुळे व यांचा मुलगा किरण हे दोघे जखमी झाले. ते दोघेही घरात झोपले होते. घराच्या मलब्यात ते दबले होते. गावातील सर्व नागरिकांनी केलेल्या बचाव कार्यानंतर एक तासाने ते सापडले. या घटनेत दुधराम जांभूळे यांचा एक पाय निकामी झाला असून उपचारासाठी त्यांना आरमोरी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.