चौडमपल्ली नाल्याला पूर; आष्टी - आलापल्ली वाहतूक ठप्प

    दिनांक :29-Jul-2019
गडचिरोली,
गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या संततधारेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील नदी, नाले भरून वाहू लागले आहेत. आज सोमवारी आष्टी - आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली नाल्याच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे वाहतूक ठप्प पडली आहे. 
 
 
आष्टी - आलापल्ली मार्गावर पावसाचा जोर वाढल्याने पाणी पुलावरून वाहू लागले. त्यामुळे खबरदारी म्हणून दोन्ही बाजूने वाहतूक काही प्रमाणात बंद करण्यात आली आहे. तरीही काही लोक जीव मुठीत धरून रस्ता ओलांडत आहेत. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील आणखी काही लहान पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे मार्ग बंद झाले आहेत. बल्लारपूर - आष्टी मार्गावरील दहेली गावाजवळ निर्माण करण्यात आलेला रपटा वाहून गेल्याने तिथेही वाहतूक खोळंबली आहे.